आम्ही उद्याच मुंबईला येऊ ; एकनाथ शिंदेनी स्पष्ट सांगितले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून या सत्तासंघर्षात एंट्री केली आहे. फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपण उद्याच मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्या राज्यपाल हे फ्लोअर टेस्टची मागणी करू शकतात.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे काल राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीची घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याच महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दिली आहे. शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…