आज यशवंत सिन्हा यांचा नामांकन दाखल ; राहुल गांधीही उपस्थित होते….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ”आम्हाला 17 हून अधिक पक्षांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर ज्या लोकांशी आम्ही संपर्क साधला नाही, त्यांनी स्वत: आमचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा जी यांना फोन करुन पाठिंबा दर्शवला आहे. आता कदाचित सर्व पक्ष एकत्र आल्यानंतर निकराची लढत होईल.”

यापूर्वी, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते की, ”राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांना शक्य ते सर्व प्रयत्न करावे लागतील.’
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे अंकगणित पाहता परिस्थिती म्हणावी तशी कठीण नाही. भाजपच्या उमेदवाराला पराजित करण्यासाठी विरोधी पक्षांना ठोस प्रयत्न करावे लागतील. वायएसआर काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्ष (BSP) सारख्या काही विरोधी पक्षांनी 18 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आधीच पाठिंबा दिला आहे, अशा वेळी शरद पवारांचे हे वक्तव्य आले आहे.
दुसरीकडे, झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ओडिशातील संथाल समुदायातील आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकते. JMM हा विरोधी गटाचा एक भाग आहे, ज्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून सिन्हा यांची निवड केली होती.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…