शिवसैनिकांचा संयम आता सुटला ; तानाजी सावंत यांच्या पुण्यातल्या कार्यालयाची केली तोडफोड……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले.
त्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. शिवसैनिक त्याठिकाणी पोहोचले त्यावेळी पोलीस घटनास्थळी नव्हते. हाताच शिवसेनेचा झेंडा घेऊन यावेळी कार्यालयाची तोडफोड (Vandalized) करण्यात आली. गद्दार असे कार्यालयाच्या काचांवर लिहून या काचा फोडण्यात आल्या आहेत. शिवसैनिकांनी यावेळी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी बंडखोरांना इशारा देताना शिवसैनिक आक्रमक झाले तर उद्रेक होईल, आग लागेल असे म्हटले होते. त्याच्या काही वेळातच शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
… तर त्या सर्वांची अशीच अवस्था होईल’
जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असेच उत्तर मिळणार. बंड करणाऱ्यांना अजूनही वेळ आहे. त्यांनी परत यावे, अन्यथा त्या सर्वांची अशीच अवस्था होईल, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले आहेत. सत्ता असताना शिवसेनेत आहे. तो काही मूळ शिवसैनिक नाही, अशी तानाजी सावंत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. हाच कळीचा नारद आहे, त्यामुळे सुरुवात आता पुण्यातून झाली आहे. ते लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. त्यामुळे वेळीच परत या, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले.
संजय राऊत यांनी दिला होता इशारा
बंडखोरी केलेल्या आमदारांनी अजूनही लक्षात ठेवावे. वेळ गेलेली नाही. शिवसैनिक शांत आहे. तो एकदा का आक्रमक झाला, तर आग लागेल, उद्रेक होईल. माझ्याकडे सांगलीचे शिवसैनिक आले होते. ते विचारत होते आम्ही काय करावे? आता हे लोक भडकले तर काय होईल, आग लागेल, असे वक्तव्य सकाळीच संजय राऊत यांनी केले होते. त्याच्या काही वेळातच शिवसैनिकांनी पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. तर तिकडे अंबादास दानवे यांनीही इशारा दिला आहे. शिवसैनिक आक्रमक नाही तर काय होणार, असा संताप व्यक्त करत बंडखोरांना परत येण्याचे आवाहन केले आहे. सुरुवात आता पुण्यातून झाली आहे. ते लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. त्यामुळे वेळीच परत या, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…