मोठी बातमी ; बंडखोर आमदारांवर कारवाईला सुरुवात ; 5 वाजेपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे पक्ष प्रतोदांचे आदेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शिवसेना पक्षाच्या वतीनं एक पत्र पाठवण्यात आलं आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी हे पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं आहे. त्यामुळे अखेर शिवसेना आता आमदारांवर कारवाई करण्याच्या तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेच्या आमदारांना पत्र पाठवण्यात आली आहे. पाच वाजता शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तरिही मुंबईत येण्यास आमदारांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता न येणाऱ्या आमदारांवर शिवसेनेकडून कारवाईचा का बडगा उगारला जातो, हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
शिवसेना आमदारांना पाठण्यात आलेल्या या पत्रामध्ये काय लिहिलंय? ते जाणून घेउयात, वाचा सुनिल प्रभु यांनी पाठवेललं पत्र जशाच तशं…

एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण 46 आमदार असल्याचं कळतंय. यात अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. गटनेते पदावरून हटवल्यानंतर एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना आपली खदखदही बोलून दाखवली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत बैठका, या सगळ्या घडामोडींना वेग आलाय.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…