अकोल्यात बनावट खत करणाऱ्या कारखान्यावर छापेमारी ; 20 लाखांचे मुद्देमाल जप्त ; एक आरोपी गजाआड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- शहरातील औद्योगिक वसाहतीतील एका गोदामामध्ये नामांकित कंपनीच्या नावाने बनावट खत तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कृषी निविष्ठा जिल्हास्तरीय पथक व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
पथकाने २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने औद्योगिक वसाहतीतील एका गोदामामध्ये छापा टाकला. यामध्ये सोडियम सल्फेट १३५ बॅग, हायब्रीड सुमो ग्रॅन्युएल १७० बकेट, इमल्सिफायर लिक्विड १४ प्लास्टिक टाक्या, निमसीडस कर्नल ऑईल २०५० लिटर, रासायनिक खत ०.५२.३४ एकूण ४०० किलो, कीटकनाशक बाटल्या ४० नग आदींसह यंत्रसामुग्री आढळली. या साहित्याची किंमत २० लाख ५ हजार ७३० रुपये असल्याचे पोलीस ठाण्यांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या साहित्याच्या आधारे शासनाच्या व शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या उद्देशाने जैवउत्तेजक उत्पादने विक्रीचे प्रमाणपत्र असताना नामवंत कंपनीच्या रासायनिक खताच्या बॅगचा वापर करून अवैधरित्या बनावट रासायनिक खत उत्पादन केले जात असल्याचे आढळले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी राहुल नामदेव सरोदे (३५) याला अटक केली. ही कारवाई जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा भरारी पथक तसेच तालुकास्तरीय भरारी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे केली.
पथक प्रमुख डॉ. मुरली इंगळे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक गोपाळ दिगंबर जाधव, जिल्हास्तरीय भरारी पथक सचिव तथा मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे, रोहिणी मोघाड, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, ग्राम विकास अधिकारी पंकज जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कर्मचारी यांनी केली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…