राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यात पवारांची भूमिका महत्त्वाची ; रणनीती ठरविण्यासाठी आज दिल्लीत दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राष्ट्रपतिपदाचा विरोधकांचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता शरद पवार यांनी नाकारली तरी गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडीवरून विरोधकांचा उमेदवार ठरविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे दिल्लीत जोरदार पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.
भेटीगाठींचा सिलसिला…..
>> अनेक मुद्यांवर आतापर्यंत विरोधकांमधील बेकी समोर आली आहे. परंतु राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व विरोधक एकाच मार्गाने जाण्याच्या विचारात असल्याने या वेळी विरोधकांची एकी अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.
>> शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. पवार यांचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर भाकपचे नेते डी. राजा, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी व आपचे खासदार संजय सिंग यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
>> बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतही पवार यांनी चर्चा केली. या वेळी राष्ट्रपतिपदाच्या विरोधकांच्या संभाव्य उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली.
विरोधकांमध्ये एकी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याच मुद्यावर बुधवारी १५ जूनला विरोधी नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीला डावे व काँग्रेसच्या नेत्यांसह बहुतेक विरोधी पक्षाचे नेते हजर असतील. यापूर्वी काँग्रेसने बोलाविलेल्या बैठकांना आप व ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली नव्हती. जुने वैमनस्य मागे ठेवून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार जयराम रमेश व रणदीपसिंग सुरजेवालाही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
पवार सेनेवर नाराज
राज्यसभेतील निवडणुकीमुळे शरद पवार शिवसेनेवर नाराज आहेत. ही नाराजी दूर व्हावी, यासाठी शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार यांचे नाव समोर करीत असल्याचा टोला केंद्रीय सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…