उत्तर प्रदेशात लता मंगेशकर यांचे नावाने चौक ; योगी सरकारच्या निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- प्रभू श्रीराम नगरी अयोध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
याचे कारण भव्य राम मंदिर किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा हे मात्र नाही. यावेळी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यामुळे ही चर्चा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या एका निर्णयानुसार, अयोध्येतील एका चौकाला लता मंगेशकर यांचे नाव दिले जाणार आहे. कोणत्या चौकाला हे नाव द्यायचे, याचा निर्णय घेण्यासाठी अयोध्या पालिकेला १५ दिवसांचा वेळ दिला आहे.
यूपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी याबाबत घोषणा केली होती. लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले होते. या घोषणेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा केली होती. भाविक जेव्हा राम मंदिर पाहण्यासाठी येतील, तेव्हा या निमित्ताने लता मंगेशकर यांच्या भजनांचेही त्यांना स्मरण होईल.
काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?
६ मे रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा अयोध्येत भगवान रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी राम जन्मभूमी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मंदिराची पाहणी केली व अयोध्येच्या विकास कामांबाबत माहिती घेतली.
याचवेळी ते म्हणाले होते की, अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावे चौक उभारून आश्वासनाची पूर्तता केली जाईल. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
अयोध्येत भगवान श्रीरामांचे दर्शन करणारे भाविक लता मंगेशकर यांचे नाव असलेल्या चौकातून हनुमान गढी व राम जन्मभूमीकडे जातील.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…