ताजमहालच्या २२ बंद खोल्यात भगवान शंकराचा निवासस्थान ; भाजपाचा दावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
आग्रा :- ताजमहालमध्ये बंद असलेल्या २२ खोल्यांमध्ये हिंदू देवीदेवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. या खोल्या उघडून चौकशी करण्यात यावी, अशी याचिकाही या नेत्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
लखनौ खंडपीठाकडे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
अयोध्येत भाजपाच्या सोशल मीडिया प्रभारींनी ही याचिका दाखल केली आहे. ताजमहालमधल्या २२ खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या खोल्या उघडा आणि तपास करण्याचे आदेश पुरातत्व विभागाने द्यावेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.

या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांचा संदर्भही देण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ताज महाल हा पूर्वी एक जुनं शंकराचं मंदिर होतं. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की तेजो महालय अर्थात ताज महाल हे ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे, असंही या याचिकेत म्हटलं आहे. ताजमहालमधल्या २२ खोल्या या कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र पी.एन.ओक आणि लाखो हिंदू भाविकांचा हा विश्वास आहे की या बंद खोल्यांमध्ये भगवान शंकरांचं अस्तित्व आहे, असा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…