घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे.
यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे.

इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आता गॅस महागला आहे. याआधी व्यावसायिक सिलिंडर महाग झाला होता. याआधी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १०२ रुपयांनी वाढल्या होत्या. एप्रिल महिन्यात या किंमतीमध्ये २६८ रुपयांनी वाढ झाली होती. त्यात पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला त्यात वाढ झाली होती. एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या असताना आता घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. १ मे रोजी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून२३५५.५० रुपये झाली, जी पूर्वी २२५३ रुपये होती. तसेच, ५ किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत ६५५ रुपये करण्यात आली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…