खासगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांचा अर्ज ; 4 मे रोजी सुनावणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शंभर कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात खांदे दुखीवर उपचारासाठी परवानगी मागितली आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ईडी 4 मे रोजी उत्तर सादर करणार आहे. त्याच दिवशी सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुख यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आले की, जे जे रुग्णालयात उपचारासाठी सुविधा ह्या अपुऱ्या आहेत. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. जे जे रुग्णालयाकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अनिल देशमुखांनी न्यायालयात खांदेदुखी असून ह्रदयविकाराची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात ईडीने उत्तर देण्यास वेळ मागितली आहे. मात्र, घरचे जेवणासाठी विरोध नाही न्यायालयाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे ईडीने म्हटले. अनिल देशमुख यांच्या दोन्ही अर्जावर 4 मे रोजी पुढील सुनावणी निर्णय घेण्यात येईल. अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जे जे रुग्णालयाला मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण? – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे कथित वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंग यांनी हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांना पाठवले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मधून दर महिन्याला शंभर कोटी रुपयाचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…