राजेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी ; BKU ने मांगितली Y श्रेणीची सुरक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी, भारतीय किसान युनियनने त्यांचे नेते टिकैत यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे.
राकेश टिकैत यांनी आरोप केला आहे की, शेतकरी आंदोलनानंतर मला आणि माझ्या कुटुंबियांच्या मोबाईलवर धमकीचे फोन येत होते, मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या विजयानंतर जीवे मारण्याची धमकमी दिली जात आहे आणि शिवीगाळ केली जात आहे. मुझफ्फरनगर पोलिसांनी या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा द्यावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. राकेश टिकैत यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.
या प्रकरणी मुझफ्फरनगर पोलिसांनी ट्विट केले की, या संदर्भात सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वस्तुस्थितीच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जात आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….