पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्था त्रुटी ; गंभीर कायदेशीर हालचाली तेज ; सुप्रीम कोर्टाकडून दखल ; भाजप राज्यपालांकडे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि झालेले उल्लंघन याबाबत गंभीर कायदेशीर हालचाली तेज झाल्या आहेत.
या सर्व प्रकाराची दखल सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही रामण्णा यांनी घेतली आहे. त्याच बरोबर पंजाब प्रदेश भाजपचे नेते राज भवन वर पोहोचले आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या त्रुटी संदर्भात सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील मनिंदरसिंग यांनी हा मुद्दा सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्याकडे उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी ताबडतोब त्याची दखल घेऊन केंद्र सरकार आणि पंजाब सरकार या दोन्ही सरकारांना नोटीस पाठवावी, असे आदेश दिले. या प्रकरणावर वेगवान सुनावणी होणे अपेक्षित आहे.
एकीकडे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असताना दुसरीकडे भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष अश्विन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेत आहे. या भेटीत हे शिष्टमंडळ राज्यपालांना कालच्या पंतप्रधानांच्या संपूर्ण कार्यक्रमासंदर्भात आणि सुरक्षा व्यवस्थेतील झालेल्या चुकीसंदर्भात संदर्भात संपूर्ण माहिती देत आहे. राज्यपाल यावर आता कोणती कायदेशीर कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…