“घरी बोलवून मंत्री केले ही चूक झाली, लोभापायी गेले ते.”; ठाकरेंची बच्चू कडू यांच्यावर टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “घरी बोलवून मंत्री केले ही चूक झाली, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
मातोश्रीवर पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे ह्यांनी मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
घरी बोलवून मंत्री केले ही चूक झाली
आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून मंत्री केला ही माझी चूक झाली. लोभापायी जे गेले त्यांना जाऊ द्या, लढणारे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, याचा मला आनंद आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पक्ष प्रवेशावेळी आमदार अंबादास दानवे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. ज्या बच्चू कडू यांच्या बरोबर आपण होतो, त्यांनी आपल्याला विकून टाकले आहे. स्वाभिमानी असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील आयुष्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राजकीय आणि सामाजिक वाटचाल करण्याचा निर्धार ठाकरे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला.

विकास लवांडेंना न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळली….
राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक ; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा…
मराठा उपसमिती बरखास्त करा अन् स्वतंत्र मंत्रालय द्या..! मनोज जरांगेंनी सरकारकडे केल्या १० मागण्या….
विधानपरिषदेसाठी आता स्वीकृत नगरसेवकांना मिळणार मतदानाचा अधिकार..? मतदार याद्यांबाबत अद्याप संभ्रम….
आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका ; सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा….
शेतकरी कर्जमाफी नेमकी कधी करणार..? CM देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली, म्हणाले…