रवी राणा हे पुढच्या निवडणुकीत नसतील :- संजय राऊत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर हे पैसे दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असे विधान बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले.
रवी राणा त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले. रवी राणा यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवी राणांवर निशाणा साधला. रवी राणा हे नेहमीच महाराष्ट्राशी मजाक करत असतात, अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा झालेला पराभव ही मजाक नव्हती.. लोकांनी त्यांना शहाणपणाने केलेल मतदान होत.. आणि हे जर त्यांनी केलेली मजाक असेल तर हे निवडणुकीसाठी केलेली नौटंकी आहे.आणि रवी राणा हे पुढच्या विधानसभेत नसतील असे त्यांनी सांगितले. शेगावात माध्यमांशी बोलत होते. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, योगेश पल्हाडे, दिनेश शिंदे आदींची उपस्थिती होती. मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना (उबाठा) कडून पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यासाठी संजय राऊत हे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. देशात आमदारांच्या गाडीवर हल्ले होत आहेत. यावर विचारले असता ते म्हणाले कि, नरेंद्र मोदी,अमित शहा यांनी दिल्ली राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत घातक पायंडा पडला आहे, विरोधक हे राजकीय वैचारिक शत्रू नसून ते दुश्मन आहेत, असं समजून त्यांच्यावर हल्ले, गुन्हे आणि खटले चालवले जात आहेत. असे ते म्हणाले. मुनव्वर फारुकी या या हास्य अभिनेत्याच्या वक्तव्याबाबत विचारले असता, स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने मराठी माणसाची आणि मालवणी समाजाची माफी मागितली आहे. त्यांनी नाक घासल आहे.आमचे कचाकच बटन दाबा आम्ही तुमच्या घरी स्वयंपाक करू, हसन मुश्रीफ यांच्या वत्व्यावर ते म्हणाले कि, आम्ही त्यांची बटणे कचाकच दाबणार आहोत आणि त्यांचा पराभव करणार आहोत. माध्यमांशी बोलल्या नांतर राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व विधाननसभा मतदार संघाचा आढावा कार्यकर्त्यांच्या भेटीतून घेतला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली.