जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी माजी सैनिक अब्दुल वहाब तर पुसद अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी जब्बार लाखे यांची निवड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नुकतीच पुसद काँग्रेस कमेटीच्या आढावा बैठकीत विधानसभा निरीक्षक श्री. राम भाऊ देवसरकार, श्री.कृष्णा भाऊ देवरकर, श्री.संजय मोघे श्री. जफर खान तथा पुसद काँग्रेसचे नेते यांच्या उपस्थिती एक मताने वरील नियुक्ती देण्यात आली.
अब्दुल वहाब यांनी देशसेवा(सेवा निवृत्त माजी सैनिक ) केली आहे, तसेच ते अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करतात
त्याच बरोबर जब्बार लाखे हे पुसद राजकारणात जवळ जवळ 25 वर्षा पासून सक्रिय आहे युवक वर्गात त्यांचा दांडगा सपंर्क आहे.
वरील दोन्ही कार्यकर्ते प्रदेश सचिव डॉ. मोहम्मद नदीम (D. N. GRUOP)यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.वरील नियुक्तीने काँग्रेस पक्षस बळ मिळेल तसेच पक्ष संघटन वाढवण्यात योगदान मिळेल त्यांच्या नियुक्तीने त्यांच्या चाहत्या वर्गात आंनदाच वातावरण आहे.
वरील दोन्हीनी आपल्या निवडीचे श्रेय डॉ. मोहम्मद नदीम, डॉ. वजहत मिर्झा,ऍड. सचिन नाईक, सय्यद इस्ती्यक,अध्यक्ष जिल्हा अल्प.जफर खान, शहर अध्यक्ष झिया भाई यांना देतात.