आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य दंगल घडवण्यासाठीच ; विखेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त आवस्थेतील असून, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तिला शोभा देणारे नाही.
शदर पवार यांच्या पाठोपाठ उध्दव ठाकरेचे संपवून टाकण्याचे आलेले वक्तव्य दंगली घडविण्यासाठी असल्याचा थेट आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री पदावर राहीलेल्या व्यक्तीला असे वक्तव्य शोभा देत नाहीत.परंतू सतेसाठी विचार गमावलेल्यांच्या तोंडी आशीच वक्तव्य येणार त्यांच्या कडून दुसरी कोणती अपेक्षा नाही आशी टिका विखे पाटील यांनी केली.
राजकारणात मतभेद असू शकतात पण भावनेच्या भरात आपण काय बोलतो याचे भानही उध्दव ठाकरे यांना राहू नये याचे आश्चर्य वाटते.राज्यात मणिपूरचा संदर्भ देवून शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि आता उध्दव ठाकरे यांची भाषा राज्यात दंगली घडविण्यासाठी आहेत का?असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील सर्व जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून,आता राज्यात महायुतीला मिळत असलेला प्रतिसाद पाहाता महाविकास आघाडीला यश मिळणार नाही हे लक्षात आल्यानेच आशी वक्तव्य पुढे येवू लागली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुध्दा आघाडीच्या तीनही पक्षाकडून भूमिका स्पष्ट केली जात नाही.काल उध्दव ठाकरे केंद्राकडे बोट दाखवून मोकळे झाले.पण तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय केले हे एकदा तरी सांगावे असे थेट आव्हान देवून नामांतराच्या संदर्भात झालेली चूक जशी पवारांनी मान्य केली तशीच चूक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मान्य करावी आशी मागणी मंत्री विखे पाटील यांनी केली.