म्हणून आम्ही उठाव केला, शिंदे गटाच्या खासदाराचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला, त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून ऑनलाईन संपर्क करत होते, त्यामुळेच आम्ही उठाव केल्याचं खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.
यावळे त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांचं जेवढं वय आहे, तेवढी वर्ष आम्ही शिवसेना बळकट करण्यासाठी खर्च केल्याचं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले जाधव? गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला.
त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक आमदार शिंदे गटात सहभागी झाल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यावर आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला, त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसून ऑनलाईन संपर्क करत होते, त्यामुळेच आम्ही उठाव केल्याचं खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंवर निशाणा तसेच यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना वाढवण्यात आदित्य ठाकरे यांचं काय योगदान आहे. आदित्य ठाकरे यांचं जेवढं वय आहे, आमच्या आयुष्यातील तेवढी वर्ष आम्ही शिवसेना बळकट करण्यासाठी खर्च केल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. आता जाधव यांच्या या टीकेला ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.