ठाकरेंच्या पक्षाला मोठं खिंडार, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्धव ठाकरे यांच्या गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा धक्का द्यायच्या तयारीमध्ये आहेत. ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं ट्वीट शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलं आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे पक्षाला गळती लागल्याचं सूचक ट्वीट नरेश म्हस्के यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हस्के यांनी मुंबई महानगरपालिकेचा फोटोही ट्वीट केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीला मुंबईतील शिवसेनेचे सचिव, आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख उपस्थित आहेत. दीपक केसरकर पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. सरकारकडून मुंबईत रखडलेल्या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे. सरकारने घेतलेले लोकउपयुक्त निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवून तळागाळातील लोकांशी जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत.
काय म्हणाले नरेश म्हस्के? परीक्षा आता जवळ आली, वाजणार आहे घंटा, लागेल कस एकेकाचा ‘उठा’ आता ‘उठा’. एकेक जण येतो आहे खऱ्या शिवसेनेत लागली आहे गळती, तिकडे शिल्लक सेनेत आजच आहे शुभमुहूर्त, असे योग येतील सतत स्वार्थ सोडून विचाराची कास एकदा धरतील परत, असं ट्वीट नरेश म्हस्के यांनी केलं आहे.