शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजित पवार यांचा वेगळा सूर, दिला मोदींना पाठिंबा…..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सुप्रिया सुळे म्हणाल्या की. ‘जुनी वास्तू मला प्रिय आहे. त्या वस्तूच्या भिंती बोलक्या आहेत. देशातील मोठमोठ्या लोकांनी इथंच बसून काम केलं आहे.
देशाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय याच संसदेत घेण्यात आले आहेत. या जुन्या इमारतीशी माझं भावनिक नातं आहे.’, असे त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
काय म्हणाले होते शरद पवार
मोदी सरकार आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, हा कार्यक्रम मी एक-दोन तास पाहिला. मी या कार्यक्रमाला गेलो नाही हे बरे वाटले. तिथे धार्मिक कार्यक्रम केले गेले. यामुळे नेहरूंची आधुनिक भारताच्या संकल्पनेस धक्का बसत आहे. हे चिंताजनक आहे. आपला देश गेल्या अनेक वर्षांपासून मागे जात आहे.