महाराष्ट्राने युवा खासदार गमावला…! काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधनं…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर :- राज्यातील ४८ खासदारापैकी काॅंग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपुरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर नागपुरातील अरिहंत या खासजी रूग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र अचानक तब्येत आणखी बिघडल्याने त्यांच्यावर आता दिल्लीला हलवण्यात आले. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वयाच्या ४७ व्या वर्षी बाळू धानोकर यांचं निधन झाल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याआधी आजारी असतांना त्यांच्या वडिलांच्या अत्यंसंस्कारलाही बाळू धानोरकर यांना जाता आलं नाही. मात्र पुत्र-पित्याचं असं अकाली निधन झाल्याने धानोरकर कुटूबियांना मोठा धक्का बसला आहे. आज सायंकाळी बाळू धानोरकर यांचं पार्थिव एअर अल्ब्युंलस ने दिल्लीहून वरोरा याठिकाणी आणण्यात येणार आहे. संध्याकाळी वरोरा येथे त्यांचं अंतिम संस्कार होणार आहे.
शिवसैनिक ते काॅंग्रेस खासदार असा बाळू धानोरकर यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून त्यांनी २००९ साली शिवसेनेने त्यांना याच मतदारसंघातून तिकीट दिले. मात्र थोडया यशाने त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर २०१४ सालापर्यंत त्यांनी अनेक संघटनात्मक आंदोलने, पक्षाची बांधणी केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकी जिंकली. त्यांनतर त्यांनी आमदारकी सोडून काॅंग्रेसकडून खासदारकी लढविली अन् त्यात ते विजयीही झाले.
दरम्यान, बाळू धानोरकर यांचं मुळ गाव चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास राहिला आहे.