यवतमाळ हादरलं…! घरात युवतीचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह ; पोलिसांना घातपाताचा संशय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये एका इमारतीमधील एका खोलीत २४ वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने यवतमाळमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या वणी घुग्गुस मार्गावरील शिव मंदिरापासून जवळच असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट मधील एका खोलीत चोवीस वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
खोलीमधून दुर्गंधी येत असल्याने घर मालकाने याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीची पाहणी केली. त्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोही वैभव बारस्कर (२४) व आरोही वानखडे अशी दोन नावे असलेली आधारकार्ड मृतक युवतीजवळ आढळून आले आहे.
या तरुणीचे माहेरचे नाव कोणते व सासरचे कोणते हा संभ्रम निर्माण झाला आहे. तिचे कुटुंबीय आल्यानंतरच तिच्या नावाची स्पष्टता होईल असे सांगण्यात येत आहे. ही युवती वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील निंबी या गावची रहिवासी असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे.
युवतीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.