राज्यभरात आम्ही ‘सावरकर गौरव यात्रा’ सुरू करणार :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या सावरकरांच्या उल्लेखामुळे आता देशाचं वातावरण चांगलंच तापलं आहे.
महाराष्ट्रातही या वक्तव्याचे पडसाद दिसून येत आहे.
राहुल गांधींचा निषेध आणि सावरकरांचा गौरव करण्यासाठी आता राज्यभरात यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.
याबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी राहुल गांधींचा निषेध केला आहे.
शिंदे म्हणाले, “राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. त्याबद्दल आता सगळा देश रस्त्यावर उतरला आहे. विधानसभेच्या प्रांगणातही आमच्या आमदारांनी याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्याबाबत असलेली ती चिड आहे.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे. म्हणूनच शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत.
सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आम्ही सुरू करत आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या वारंवार केलेल्या अपमानाचा आम्ही यामध्ये निषेध करू.”