अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन उघड ; मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
जोधपूरच्या लुनी पोलिसांनी रविवारी आरोपी धाकड राम विश्नोई यांचा मुलगा रामलाल (21 वर्षे) रा. सियागो, धानी रोहिचा कलान याला ताब्यात घेतले. आरोपीला मुंबई येथून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जोधपूरचे डीसीपी पश्चिम गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सलमान खान व्यतिरिक्त आरोपी धाकड राम विश्नोईने पंजाबचा गायक सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनाही ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील सदर पोलिस ठाण्याचे एक पथकही आरोपीला पकडण्यासाठी शुक्रवारी, २४ मार्च रोजी जोधपूरला रवाना झाले होते. ‘
जिवे मारण्याची धमकी ईमेलच्या माध्यमातून पाठवल्याप्रकरणी मुंबई शहर वांद्रे सर्कल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एएसआय बजरंग जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईहून एक पथक रविवारी जोधपूरला रवाना झाले आहे.
जयप्रकाश अटल यांच्या निरिक्षणाखाली लूणी पोलीस ठाण्यातून मदत उपलब्ध करून देण्यात आली. लूणीचे एसएचओ ईश्वर चंद्र पारीक यांच्यासह पथकाने आरोपी धाकड राम विश्नोईला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
12 सप्टेंबर 2022 रोजी सरदारपुरा पोलिस स्टेशनच्या पथकाने धाकड रामला अवैध शस्त्रांसह अटक केली होती. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आता मुंबई पोलीस आरोपींची सखोल चौकशी करणार आहेत. तसेच, लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि त्यांच्या इतर संपर्कांचा शोध घेतला जाईल. आरोपींना मुंबई न्यायालयात हजर केल्यानंतर रिमांडची मागणी करण्यात येणार आहे….