विधिमंडळातील सरकारची बेफिकिरी लोकशाहीसाठी धोकादायक, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी डागली तोफ….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची सभागृहात उपस्थिती नसल्याने प्रश्न, लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची वेळ विधानसभा अध्यक्षांवर अनेकदा आली.
आपल्या राजकीय कारकीर्दीत पाहिलेले असे पहिलेच अधिवेशन आहे, अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज व्यक्त केली. विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल सरकारची अनास्था, बेफिकिरी लोकशाहीसाठी धोकादायक ठरेल, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधान भवनातील पत्रकार कक्षात पत्रकांराशी संवाद साधला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
अलीकडे, सत्तारूढ पक्षानेच सभागृहात गोंधळ घालण्याचा, किधिमंडळ पायऱयांकर आंदोलन करण्याचा, नका पायंडा सुरू केलाय. सत्तारुढ पक्षाने, सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडकायचे असतात, सत्ता पण उपभोगायची आणि आंदोलनही करायचे, हे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे सांगत अजित पकार यांनी सरकारच्या कामगिरीबद्दल नाराजी क्यक्त केली.
जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत तरी काम करा
तुम्हाला राज्यात सत्ता हकी, मंत्री क्हायचे आहे, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरिटी पाहिजे, पण काम करायचे नाही. हे कसं चालेल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायचा तेव्हा येईल. जो यायचा तो येईल, परंतु जोपर्यंत सत्तेत आहात, तोपर्यंत तरी काम केले पाहिजे असे खडेबोल अजित पवार यांनी सरकारला सुनावले.
या सरकारवर कोणाचा विश्वास राहिलेला नाही
सध्याच्या राजकारणात गेल्या 6-8 महिन्यांत एक गलिच्छ संस्कृती दिसू लागली आहे. हे भयानक चित्र आहे. विधान भवनात येताना आमच्याकडे एक वेगळी जबाबदारी असते. त्याची जाण विरोधी पक्ष म्हणून आहे. पण ती जाण सत्ताधाऱयांना कधी येणार, असा रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला केला आहे. कुठल्याही नागरिकाला यंदाचा अर्थसंकल्प पटलेला नाही. कारण या सरकारवर कोणाचा विश्वास राहिलेला नाही. जगालाही माहितेय हे अल्पावधी सरकार आहे. जास्त टिकणारे नाही आहे, अशी टीका करत लोकशाहीसाठी आमचा लढा सर्वोच्च न्यायालयात सुरू असून रस्त्यावरदेखील आम्ही लढत आहोत. अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून आमची स्पष्ट भूमिका होती की, जास्त गदारोळ करायचा नाही, गोंधळ न करता सभागृह चालू ठेवून प्रक्रिया पार पाडायची. पण प्रत्येक विषयावर आम्ही बोलण्याची संधी मागत होतो. पण आरडाओरड केल्यानंतर आम्हाला संधी मिळत होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
जनतेच्या पैशाची लूट
राज्यात भाजपप्रणीत सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. मागील 9-10 महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-20 परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, पण शेतकऱयांना देण्यासाठी नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.