केमिस्ट सांत्वना समिती ; आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुसद औषधी विक्रेता संघाचा नाविन्यपूर्ण उपक्रम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात मोठी व्यवसायिक संघटना असलेल्या ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट् तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्टन अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त औषधी विक्रेता संघ पुसदच्या वतीने केमिस्ट सांत्वना समिती स्थापन करण्यात आलीआहे. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाला आपण काही देणं लागतो या उदात्त विचाराने प्रेरित होऊन व्यवसाय करीत असताना सामाजिक् प्रकल्प सुद्धा आपल्या संघटनेने राबवायला पाहिजे हे विचार आप्पासाहेब शिंदे यांनी सर्व केमिस्ट संघटनांना दिलेत व ते प्रत्येकाच्या मनावर बिंबविले
औषधी विक्रेता संघ पुसदच्या वतीने सुद्धा स्वर्गरथ्, सर्जिकल बँक इत्यादी सेवा प्रकल्प राबविल्या जातात. आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून पुसद औषधी विक्रेता संघाच्या वतीने केमिस्ट सांत्वना समितीची स्थापना यवतमाळ जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे संघटन सचिव सुरज डुबेवार यांचया संकल्पनेतून साकारण्यात आली. आपल्या भारतीय परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या घरी परिवारातील सदस्याचा मृत्यू झाल्यास अन्न शिजवणे वर्ज मानल्या जाते .याच गोष्टीचा विचार करून एखाद्या केमिस्ट परिवारात दुःखद घटना घडली किंवा कोणाचा मृत्यू झाला तर त्या परिवारातील 20 ते 25 सदस्यांसाठी निशुल्क भोजन घरपोच देण्याची व्यवस्था पुसद औषधी विक्रेता संघाद्वारे आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली.
सदर प्रकल्प संपुर्ण शहरात इतर संघटनांमध्ये राबवणयाचा मानस यावेळेस चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा संघटन सचिव सुरज डुबेवार यांच्यातर्फे व्यक्त करण्यात आला. यावेळी औषधी विक्रेता संघ पुसत चे अध्यक्ष रविंद्र पदमवार, सचिव सुशांत महल्ले, उपाध्यक्ष गजानन गादेवार, स्वप्निल गवळी तसेच नितीन त्रंकटवार उपस्थित होते.