काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी महापालिका निवडणुका, चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक यासंदर्भात आज राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलवली. या बैठकीत राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित होते.
या बैठकीत निवडणुकां तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत.चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीत चर्चा करून आम्ही उमेदवार देणार असल्याची माहिती अलिकडेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली होती. त्याचसंदर्भात आज मुंबईत बैठक झाली आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या फायर ब्रॅंड नेत्या रूपाली पाटील यांनी निवडणुक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केलीय. तर चिंचवडमधूनही राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी असं कार्यकर्तेचं म्हणणं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, यातच कसबा पेठ पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपसह शिवसेना, मनसेही आपला उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचं बोललण्यात येत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार का ? याची उत्सुकता आता राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.