माणुसकीची भिंत महिला सदस्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रुग्णालयातील रुग्ण महिलांसोबत केला साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- माणुसकीची भिंत च्या महिला सदस्यां व ए.व्ही.एस.बीसी ग्रुप शंकर नगर या महिलानी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हळदीकुंकवा निमित्त उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे भरती असलेल्या ग्रामीण भागातील नवजात शिशुच्या मातांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन त्यांना साड्या व त्यांच्या बाळांना स्वेटर व तेथील डोळ्याचे ऑपरेशन झालेल्या वृद्ध महिलांना ब्लॅंकेट व पोळी भात भाजी जिलेबी चे जेवण देऊन हळदी कुंकवाचा सण वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळेस माणुसकीची भिंत महिला सदस्य मोनिका जाधव यांनी सर्व महिलांना आवाहन केले की गरजूंना मदत करता येईल तशी मदत करूनच आपले सण साजरे केले पाहीजे माणुसकीची भिंतीच्या महिला सदस्या असे अनेक वेगवेगळे उपक्रम घेत असतात जसे की वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांसोबत व अनाथ मुलान सोबत रक्षाबंधन व भाऊबीज साजरी करने वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना टॉवेल टोपी कपडे फराळ व जेवण देऊन गरजूंना मदत करून पुसद वासियांच्या सहकार्याने सण साजरे करत असतात
या कार्यक्रमास माणुसकीची भिंतच्या महिला सदस्या मोनिका जाधव शिवानी नरवाडे अर्चना गावंडे रेखा आगलावे प्रियंका बेले विद्याताई राठोड मॅडम संध्या महल्ले आरती चक्करवार सुनिता जन्नावर स्मिता प्रतापवार विभा अनंतवार मीना बेलोरकर दिपाली आरगुलवार नेहा बेलोरकर राखी अनंतवार शितल अनंतवार वनश्री मोटरवार शुभांगी कवटीकवार वैशाली कपटीकवार राणी गादेवार सरोज व्यवहारे लता डुब्बेवार रेखा चक्करवार मेघा बनगिनवार रूपाली पद्मावार वायवि प्रतापवार स्नेहा चिंतावार लक्ष्मी प्रतापवार विजया पापीनवार व इतर माणुसकीच्या भिंतीला मदत करणाऱ्या महिला उपस्थित होत्या…