मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून कोणत्याही उमेदवाराला जाहीर पाठिंबा नाही :- शेख अब्दुल रहीम ; महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची भूमिका जाहीर….!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे आज दुपारी 12 वाजता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची कोर कमिटी बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या 2 पदवीधर अणि 3 शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत संघटनेच्या भूमिका अणि पाठींबा जाहीर करण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे. जे उमेदवार जुनी पेन्शन योजना मिळवून देईल तसेच लढा देईल त्याला याच एकमेव मुद्द्यावर जाहीर व सक्रिय पाठिंबा देण्यात आलेला आहे.
– मराठवाडा शिक्षक मतदार संघात कोणत्याही उमेदवाराला जाहीर पाठिंबा न देता तटस्थ राहण्याची भूमिका व निर्णय…
– नाशिक पदवीधर मतदार संघात
अपक्ष उमेदवार श्री. सत्यजीत तांबे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
– अमरावती पदवीधर मतदार संघात उमेदवार श्री.धीरज लिंगाडे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आले आहे.
– कोकण शिक्षक मतदार संघात ही कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा ना देता तटस्थ राहण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
– नागपूर शिक्षक मतदार संघात स्वतः संघटनेचे पुरस्कृत उमेदवार श्री. नरेंद्र पिंपरे यांना उभा केला आहे.
संघटनेतर्फे सर्व जिल्हाध्यक्ष/ सचिव यांना सूचना देण्यात आल्या अणि तसेच सर्व सदस्यांना आपपल्याला परीने प्रयत्न/ मदत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पत्रकावर राज्याचे अध्यक्ष शिवराम घोती, राज्याचे सचिव सचिन चव्हाण, राज्य प्रवक्ता तथा मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम स्वाक्षरी आहेत…