ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का..? फडणवीसांच्या कार्यक्रमात का दिसत नाहीत..? सर्व चर्चांबाबत पंकजा मुंडेंनी केला खुलासा, म्हणाल्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. शिवसेनेच्या काही नेत्यांनी तर पंकजा यांचे पक्षात स्वागत करू अशीही हाक दिली होती.
पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबत स्वतः त्यांनी खुलासा केला आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. यांनतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांबाबत भाष्य केले.
‘माझ्या मनात कोणतीही खदखद नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरु असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लावला. ठाकरे गटाच्या ऑफरबाबत काय वाटत ? असा सवाल मध्यमकर्मीनी विचारला असता पंकजा म्हणाल्या,”प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी ओव्हरटेक करत नाही,माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उतत दिल हीच मोठी गोष्टी आहे” असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं.
पंकजा मुंडे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करुक्रमांसाठी उपस्थित का राहत नाहीत ? असा सवाल विचारला असता, ‘मीही ती चर्चा ऐकली आहे,त्यावर वेगळी पत्रकार परिषद घेता येईल’ असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिल. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली कार्यकर्ता आहे. मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते,कोणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाबाहेरील कार्यक्रमांना जाण मला कंपलसरी नाही असंही मुंडे यावेळी म्हणाल्या.
काय म्हणाले होते भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
“विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल अफवा पसरवू नये त्या एक प्रगल्भ नेत्या आहेत.पंकजा मुंडे यांच्या रक्तात भारतीय जणता पार्टी आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, या सर्व केवळ चर्चा आहेत. त्या राष्ट्रीय राजकारण असून त्यांना कोणीही फूस लावू शकत नाही” असा विश्वास देखील यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला होता.