मोदींच्या मुंबईमधील सभेपूर्वीच बेकेसीमधील कमान कोसळली….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामाचं उद्घाटन होणार आहे.
त्यानंतर आज सायंकाळी त्यांची वांद्रे-कुर्ला संकुलात भव्य अशी सभा होणार आहे. बीकेसीमध्ये मोदींच्या स्वागतासाठी भव्य अशी सजावट करण्यात आली आहे. मात्र त्यातीलच एक कमान कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवानं कोणतीही हानी झालेली नाही.
सध्या पोलीस आणि कार्यकर्त्यांकडून ही कमान हटवण्याचं काम सुरू आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे-कुर्ला संकुलात भव्य अशी सभा होणार आहे.
सभेच्या ठिकाणी मोठी सजावट करण्यात आली आहे. मोदींच्या स्वागतासाठी भव्य अशी कमान उभारण्यात आली होती. मात्र ही कमान कोसळली आहे. आता घटनास्थळावरून ही कमान हटवण्याचं काम सुरू आहे.
पोलीस आणि कार्यकर्त्यांकडून ही कमान हटवली जात आहे. विविध विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज मुंबईमधील विविध विकास कामाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर त्यांची बीकेसीमध्ये भव्य अशी सभा होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. दरम्यान आज मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.