बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आमनेसामने येणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधान भवनातील सेंट्रल हॉल येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचे नाव छापण्यात आले नाही.
यावरून शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यामागे एक राजकारण आहे. राज्यात बाप चोरणारी टोळी सक्रिय झालीय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असा टोला त्यांनी लगावला होता.