न. प. हिंदी व मराठी प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये आंतरशालेय क्रिडा व कला महोत्सव साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- स्थानिक नगर परिषद द्वारा संचालित हिंदी व मराठी प्राथमिक शाळा क्र १ मध्ये दि. १६/०१/२०२३ व १७/०१/२०२३ या दोन दिवशी आंतरशालेय क्रिडा व कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता या मध्ये वर्ग १ ते ४ मधील मुले मुली गट अ मध्ये खोखो लंगडी कबड्डी व धावणे या चुरशीच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष न. प. मुख्याधिकारी डॉ किरण सुकलवाड होते व प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी एस कार्तिकेयन होते तसेच उपमुख्याधिकारी राठोड प्रशासन अधिकारी मदने शाळा क्र २ चे मुख्याध्यापक उत्तम जाधव सर शाळा क्र १० चे मुख्याध्यापक शिवाजी टारफे सर होते तसेच शा. व्य. समिती चे सर्व पदाधिकारी शाळा परिसरातील पालक जेष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठीत नागरिक व युवा वर्ग व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते मान्यवरांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
त्यानंतर महोत्सवाचे आयोजक मुख्याध्यापक सुनील जाधव व सुनील चव्हाण पाटील सर यांनी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देउन स्वागत केले के. डी डाखोरे यांनी सुंदर स्वागत गीत सादर केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सीमा पाटील व रेखा डाखोरे यांनी उत्कृष्ट रित्या जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जाधव सर यांनी केले नंतर मान्यवरांनी कला महोत्सवातील चिमुकल्या मुलांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची वातावरणातील थंड शितल लहरी च्या आनंददायी वातावरणात सुरवात करण्यात आली या मध्ये सुरवातीला बालवाडी च्या चिमुकल्या नी सादर झालेल्या नृत्य ने उपस्थितांची मने जिंकली नंतर मुलामुलींनी बहारदार नृत्य सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढविली व सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या स्वरूपात दाद देउन मुलांचे कौतुक केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन के. डी डाखोरे यांनी केले व क्रिती आवते यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी पुष्पा सिहोतीया शिक्षिका शिपाई अरुणा पवार राधिका ठोके योगिता फटाले यांनी सहकार्य केले…