काँग्रेस नेते सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा, २०१७ मधील प्रकरणामुळे अटक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस नेते, माजी मंत्री आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली. २०१७ मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे.
नागपूर येथील केळवद पोलीस स्टेशनमध्ये सुनील केदार यांच्याविरोधात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. २०१७ मध्ये कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुनील केदार यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.