महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप….! ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची यामुळे अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी झाल्याचं स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट संकेत दिलेत. सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेची भूमिका आणि काँग्रेसची भूमीका दोन्ही विरुद्ध टोक असल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीत अस्वस्थ आहेत.
राहुल गांधींची सावरकरांबद्दलची भूमिका ठाकरे गटात अस्वस्थाता निर्माण करत आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सावरकरांबाबत ठाकरे गटाची भूमिका गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेलं वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाही. सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराचं आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी, असं संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं. भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता, हा विषय नव्हता, आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहोत आणि राहणार.
आम्ही सावरकरांवर केलेली टिपणी सहन करणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा फोन आला : संजय राऊत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, अशामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी संजय राऊत यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. मनसे-भाजपचं ढोंग दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशानंतर बुलडाण्यात जाऊन, राहुल गांधींच्या शेगावातील सभेत निषेध नोंदवण्याचा निर्धार केला. तर इकडे मुंबई, ठाण्यात भाजपने रस्त्यावर उतरुन राहुल गांधींचा निषेध केला. मात्र मनसे-भाजप रस्त्यावर उतरले हे ढोंग आहे. राजकीय फायदे तोटे पाहून वीर सावरकरांवरून रस्त्यावर उतरण्याचं काहींचं काम सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.