अजित पवार नॉट रिचेबल…?, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर आक्रमक पावित्रा घेतला आहे. मात्र अशा स्थितीत देखील पवार यांनी साधी प्रतिक्रियाही व्यक्त न केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरापासून पवार नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे.