सत्तारांच्या आक्षेपार्ह विधानानंतर CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक…..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तारांना फोन केला. तसेच सत्तारांना जाहीर माफी मागण्याचे आदेशही दिल्याचं सुत्रांकडून कळते.
त्याचबरोबर तातडीची बैठक बोलावली आहे. एका वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त दिलं आहे.
काही वेळांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. फोन आल्यानंतर सत्तार घाईगडबडीत बाजुला गेले. पण त्यांच्या बोलण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश दिल्याचं कळतंय.
दरम्यान, वाचाळवीर नेत्यांना कंटाळून शिंदेंनी प्रवक्त्यांची बैठक बोलावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवक्ते व महत्वाच्या नेत्यांशिवाय इतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद न साधण्यावर मुख्यमंत्री वटहुकुम काढणार असल्याचंही सुत्रांकडून कळतंय
राष्ट्रवादी काँग्रेस आता सत्तराविरोधात आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सत्तारांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबईत सत्तारांच्या घरावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दगडफेकही केली. तसेच त्यांना राज्यात फिरु देणार नसल्याचा इशाराही दिला आहे.
सत्तार नेमकं काय म्हणाले?
सुप्रिया सुळेंकडून खोके घेणारे मंत्री असा उल्लेख केल्यानं अब्दुल सत्तार चिडले होते. यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांना थेट भिकार….अशा शब्दांत शिविगाळ केली. हा आक्षेपार्ह शब्द त्यांना एकदा नव्हे दोनदा माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंबद्दल वापरला. याबाबतच वृत्त वेगानं राज्यभरात पसरलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आणि चोवीस तासात आपले शब्द मागे घ्या असा अल्टिमेटम सत्तारांना दिला.