राणांना भेटतो, एकत्र जेवण करतो. आता वाद मिटला – बच्चू कडू….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- ”मला वाद वाढवायचा नाही, या वादातून जनतेचे काहीच भले होत नाही. त्यामुळे वाद मिटला,” असे सांगत आमदार बच्चू कडू यांनी आज आमदार रवी राणा यांच्याशी झालेल्या वादावर पडदा टाकला.
प्रसारमाध्यमांनीही आमच्यात वाद होईल असे अर्धवट वृत्त देऊ नये, अशी विनंतीही मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. रवी राणा यांना भेटण्याचा आज प्रयत्न करतो, आम्ही दोघेही एकत्र जेवण करू, असेही कडू या वेळी म्हणाले.
”वादातून कोणाचं भलं झालं असतं तर या वादाचा उपयोग झाला असता. उलट मी सभा घेतली आणि राणाजींचे आभार मानले. मला वाद करायचा नाही. पण काल दुपारी तीन वाजता प्रश्न मिटला म्हणणारे राणा सायंकाळी सहा वाजता घरात घुसून मारू असे वक्तव्य करतात आणि त्यामुळेच गोंधळ निर्माण होत आहे,” असे कडू यावेळी म्हणाले. आता आपणही शांत राहायचे ठरवले आहे, असे ते म्हणाले.
”खोक्यांसाठी नव्हे तर माझ्या मतदारसंघातील जनतेची कामे सरकार बदलल्यामुळे थांबू नयेत म्हणून मी फडणवीस यांच्या त्या पह्नवरून गुवाहाटीला गेलो असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्तेसाठी, राजकारणासाठी एकत्र नाही आलो तरी आम्ही जिह्यासाठी एकत्र यायला तयार आहोत,” असेही ते म्हणाले.