मोठी बातमी ; राज्यपालांना कोरोना ची लागण ; रिलायन्स रुग्णालयात दाखल ; परिस्थिती स्थिर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली.
त्यांना कोरोना सदृष्य लक्षणं दिसू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. रिलाईन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगानं वाहू लागलेत. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…