“हिम्मत असेल तर खाली या” , हनुमान चालीसा वाद पेटला ; राणांच्या इमारती समोर शिवसैनिकांची घोषणाबाजी.…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. त्यातच राणा दांपत्यानी आज २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे.
मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या घराबाहेर जाम ठोकला आहे.
“हिंमत असेल तर खाली या”, असे खुले आव्हान शिवसैनिकांनी राणा दांपत्याला दिले आहे. शेकडोंच्या संख्येने राणा दांपत्याच्या घरासमोर शिवसैनिक जमले आहे. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येत आहे. आता या बंदोबस्तात राणा कुटुंब मातोश्रीवर पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे रवी राणा यांनी त्यांच्या घरात पूजा करत उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या सुख शांतीसाठी आज मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र घराबाहेर शिवसैनिकांनी जाम ठोकला असताना आता राणा दांपत्य बाहेर कसे पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..