राज्यात पुन्हा पाऊस ; नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सध्या राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांत तापमान ४२ अंशाच्या वर गेलं आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पण, आता राज्यातील काही भागांत गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
याबाबत हवामान विभागानं (IMD) अंदाज वर्तविला आहे.
विदर्भात उष्णतेची लाट कायम –
राजस्थानसह काही राज्यांमधील लाटसदृश्य वातावरणामुळे गेल्या २९ मार्चपासून विदर्भातील तापमान ४२ अंशावर गेलं असून उष्णतेची लाट आहे. तसेच आज २ एप्रिल आणि उद्या ३ एप्रिलला विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. अकोला, नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोकांना उन्हाचे सर्वाधिक चटके जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडणं टाळावं. महत्वाचं काम असेल तर उन्हापासून स्वतःचा बचाव करून प्रवास करावा. तसेच भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होईल. अशा सूचना हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आल्या होत्या.

राज्यातील या भागात पाऊस –
गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणात उष्णतेची लाट आली होती. तापमान अचानक वाढलं होतं. तसेच मुंबईत देखील तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत होता. पण, आता कोकणवासियांना आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ५ आणि ६ एप्रिलला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….