क्षयरोग बरा होण्यासाठी रुग्णांना नियमित औषधोपचाराचे महत्व सांगावे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना ; जागतीक क्षयरोग दिन साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- क्षयरोग रूग्णांनी डॉट्स हा औषधोपचार नियमित घेतल्यास क्षयरोग पुर्णपणे बरा होतो. त्यामुळे रुग्णांनी नियमित औषधोपचार घ्यावा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील क्षय रूग्णांना नियमित औषधोपचाराचे महत्व पटवून देण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. क्षयरोगाविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज व त्याविषयी घ्यावयाची योग्य औषधोपचार व काळजी यासाठी जिल्हा क्षयरोग दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या श्री. वसंतराव नाईक सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पि. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.राजकुमार राठोड, कुष्ठरोग सहायक संचालक डॉ.प्रशांत पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजयकुमार पांचाळ, डॉ .सागर जाधव, डॉ.मनोज तगडपल्लीवार, डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, डॉ.तनवीर शेख, डॉ .निलेश लिचडे, डॉ .प्रिती दुधे, व प्रिती दास यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पुढे बोलतांना क्षयरोगाचे उच्चाटन हे गावपातळीपर्यंत होणे आवश्यक असल्याचे सांगीतले. इ.स. 2025 पर्यंत क्षयरोग पुर्णपणे संपावायचा आहे. यासाठी जिल्ह्यात 66 प्राथमिक आरोग्य केंद्र, 17 ग्रामीण रूगणालय व एक वैद्यकीय महाविद्यालय तसेच 42 मान्यताप्राप्त सुक्ष्मदर्शी केंद्र व 2308 डॉट्स प्रोव्हायडर कार्यरत आहेत.
जिल्हा क्षयरोग अधिकारी सुभाष ढोले यांनी वर्ष 2021-22 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय संस्थेत 2380 व खाजगी विभागामध्ये 940 असे एकुण 3320 क्षयरुग्ण शोधण्यात असून त्यापैकी 90 टक्के रुग्ण बरे झाले असल्याचे सांगितले. क्षय रूग्णांना चालू वर्षात पोषण आहारासाठी ‘निक्षय पोषण योजने’ अंतर्गत दरमाह प्रतिरुग्ण रुपये 500 प्रमाणे एकुण 56 लाख 72 हजार रुपयाचा लाभ देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जागतीक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे संचालन शशांक चुंभळे यांनी केले तर प्रस्ताविक रुपेश फुसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे एम.डी.राठोड,अस्लम खान, सुरेश दांडगे, आशिष देशमुख, प्रभाकर जिचकार, स्वप्नील अंबाडकर, बालाजी कदम, धनवे, माया चौधरी, कविता सरोदे, निता मुंडवाईक (हांडे), भावेकर, शिवदास श्रीरामे, दिपक बावणे, कोंढावे व इतर सर्व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….
३ मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा अखेर रद्द, आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा पेपर..?
सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?