किरीट सोमय्या शनिवारी दापोली दौऱ्यावर ; शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दापोली :- किरीट सोमय्या २६ मार्चला म्हणजेच शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथे रिसॉर्ट असल्याचा आरोप करत, हे अवैध रिसॉर्ट तोडुया, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
तर, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा ईशारा दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी, मिलींद नार्वेकर यांचा बंगला तुटला, आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया, असा इशारा देत, चलो दापोली, असे ट्विट केले आहे.
किरीट सोमय्या यांच्यामुळे कोकणातील दापोली मुरूड येथील पर्यटन उद्योजकांना नोटिसा आल्या आहेत. जर कोकणातील पर्यटन उद्योगाच्या आड कुणी येणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय कदम यांनी दिला आहे. याच बरोबर, दापोली शहरातच सोमय्या यांना वापस चले जाव, असे म्हणत रोखण्याचा इशाराही त्यांनी बुधवारी नगरपंचायत येथे पत्रकार परिषदेत दिला. या इशाऱ्यानंतर आता शनिवारी दापोलीतील शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. यामुळेच आता सोमय्या यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….