राखीताई रितेश पुरोहित ,लोकमत – “वुमन अचिव्हर्स अवार्ड ” ने सन्मानित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
राखीताई रितेशजी पुरोहित कुटुंब , परिवाराचा सांभाळ करतानाच संस्थांचा सर्व दृष्टीने विकास करण्याचे जणू वरदानच, पुसद येथील पद्मावती पुरोहित महिला अर्बन को – ऑप . क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष राखी रितेश पुरोहित यांना लाभले आहे . जिद्द , चिकाटी आणि परिश्रमाची जोड त्याला मिळाली आहे . राखीताई पुरोहित यांच्या संस्थांनी घेतलेली भरारी , ही त्याचीच फलश्रुती आहे .
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात , यासाठी पद्मावती क्रेडिट सोसायटीची दारे उघडी झाली . महिलांना उद्योग सुरू करता यावा , यासाठी त्यांना आर्थिक बळ देण्यात आले . सोसायटीने मदतीचा हात पुढे केल्याने अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या आहेत . आज नामवंत , विश्वासू प्रतिष्ठान म्हणून यासोसायटीकडे पाहिले पाऊल महिलांच्या हाती दिले आहे . या प्रशंसनीय कार्याची दखल लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राने घेतली.त्यांच्या या गौरव कार्याचा सन्मान म्हणून राखीताई रितेशजी पुरोहित यांना यवतमाळ येथे लोकमत “वूमन अचिव्हर्स अवार्ड” ने सन्मानित केले.