सेंट्रल बँकेत तरुणांना नोकरीची संधी 17 डिसेंबर पर्यंत करा ऑनलाइन अर्ज ; 17 डिसेंबर पर्यंत सादर करावा यानंतर अर्ज करण्याची रजिस्ट्रेशन विंडो बंद होईल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापूर :- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
या अंतर्गत सुरक्षा अधिकारी (Security Officer), जोखीम व्यवस्थापक (Risk Manager), आर्थिक विश्लेषक (Financial Analyst), क्रेडिट अधिकारी (Credit Officer), इकॉनॉमिस्ट (Economist), डेटा सायंटिस्ट (Data Scientist), टेक्निकल ऑफिसर (Technical Officer)), लॉ ऑफिसर (, Law Officer), आयकर अधिकारी (Income Tax Officer) आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या भरती (Recruitment) प्रक्रियेद्वारे एकूण 115 पदांची भरती करेल. ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइट centerbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, 17 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी संधी आहे. अर्ज सादर करण्यासाठी काही दिवसांचाच अवधी आहे. यानंतर अर्ज करण्याची रजिस्ट्रेशन विंडो बंद होईल.
या तारखा लक्षात ठेवा…
ऑनलाइन अर्जाची तात्पुरती सुरुवात तारीख : 23 नोव्हेंबर 2021
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 17 डिसेंबर 2021
सीबीआय एसओ प्रवेशपत्राची तात्पुरती तारीख : 11 जानेवारी 2021
सीबीआय एसओ परीक्षेची तारीख : 22 जानेवारी 2022
जाणून घ्या शैक्षणिक पात्रता…
इकॉनॉमिस्टच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बॅंकिंग / कॉमर्स / पब्लिक पॉलिसीसह इतर विषयांमध्ये पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय व्यावसायिक बॅंकेत किमान पाच वर्षांचा कामाचा अनुभव.
आयकर अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी असणे आवश्यक आहे. पात्रतेव्यतिरिक्त किमान 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेटा सायंटिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून Statistics / Econometrics / Mathematical / Finance / Economics /Computer Science यामध्ये पीजी दवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला 8 ते 10 वर्षांचा अनुभव असावा.
आर्थिक विश्लेषक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वित्त विषयात CA / ICWA किंवा MBA असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचवेळी विविध पदांवरील भरतीशी संबंधित अधिक पात्रता तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.