पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मिडिल ईस्ट’मधील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या टंचाईमुळे देशात इंधनाचा भडका उडाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या दबावानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीं मध्ये वाढ केली आहे.
गेल्या 10 दिवसांतील ही सलग तिसरी दरवाढ आहे. या ताज्या वाढीमुळे पेट्रोल प्रतिलीटर 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग झाले आहे.
वाढलेले हे नवीन दर आज 23 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असल्याने रोजच्या गरजेच्या वस्तू आणखी महाग होण्याची भीती वर्तवली जात आहे.
मे महिन्यात कधी आणि किती वाढले दर?
16 मे 2026 रोजी तब्बल 4 वर्षांनंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 3 रुपये प्रतिलीटरची मोठी वाढ करण्यात आली. त्यानंतर 19 मे रोजी दुसऱ्यांदा पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागले. त्यानंतर आज 23 मे रोजी तिसऱ्यांदा पुन्हा पेट्रोल 87 पैसे आणि डिझेल 91 पैशांनी महाग झाले आहे. एकूण विचार गेल्या काही दिवसांतच पेट्रोल-डिझेलच्या किमती सुमारे 5 रुपये प्रतिलीटरने वाढल्या आहेत.
दरवाढीनंतर पेट्रोलचे आजचे दर
मुंबई: 108.49 रुपये (वाढ: +0.90 पैसे)
दिल्ली: 99.51 रुपये (वाढ: +0.87 पैसे)
कोलकाता: 110.64 रुपये (वाढ: +0.94 पैसे)
चेन्नई: 105.31 रुपये (वाढ: +0.82 पैसे)
दरवाढीनंतर डिझेलचे आजचे दर
मुंबई: 95.02 रुपये (वाढ: +0.94 पैसे)
दिल्ली: 92.49 रुपये (वाढ: +0.91 पैसे)
कोलकाता: 97.02 रुपये (वाढ: +0.95 पैसे)
चेन्नई: 96.98 रुपये (वाढ: +0.87 पैसे)

कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करा; गडकरींचा मोठा दावा- वाहने आता फक्त २५ रुपये दराच्या इंधनावर चालतील…
NEET पेपरफुटी प्रकरणात अटक केलेले ११ पैकी ७ जण महाराष्ट्रातील ; प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनीच ती कशी फोडली..?
‘..तर उद्या सकाळी जीवन संपवतो’; मनोज जरांगेंच्या विधानाने राज्यात खळबळ…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…