शेतकरी कर्जमाफी नेमकी कधी करणार..? CM देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली, म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सर्वांत मोठे संकट हे एल निनोचे आहे. पावसाचा अंदाज ८८ टक्के वर्तवण्यात आला आहे. उतरत्या क्रमाने पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे पिकांवर त्याचा ताण अधिक येण्याचा अंदाज आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार कसे नियोजन करता येईल, याबाबत व्यवस्थापन करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना दिले जाणारे पीक कर्ज, शेतकऱ्यांची कर्जमाफी, खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियांणांची, खतांची उपलब्धता तसेच यावेळी पावसाचा अंदाज या सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषदेत दिली.
खतांच्या पुरवठ्यावर सरकारचे कडक लक्ष
जलयुक्त शिवारांच्या कामाला गती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविस्तार अॅप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पीक पद्धती आणि इतर माहिती एआयच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. शेतकरी आपले प्रश्न विचारू शकतात. त्यावर आवश्यक ती माहिती या अॅपच्या माध्यमातून दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या खतांच्या पुरवठ्यावर सरकारचे कडक लक्ष आहे. यावर्षी जागतिक परिस्थितीमुळे खतांच्या उत्पादनावर अधिक ताण असेल. औद्योगिक क्षेत्रासाठी खते वळवली जात नाही ना, याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यासंबंधी व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. पाण्याचा कमीत कमी उपयोग कसा करता येईल, असा प्रयत्न करावा लागेल. पिकांचे सायकल कसे नीट करता येईल असा प्रयत्न करायला पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
शेतकरी कर्जमाफी नेमकी कधी करणार?
आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितले आहे की, शेतकऱ्यांना कोणत्याही सिबीलची मागणी करू नये. बँकांच्या मुख्यालयांनी प्रत्येक शाखेला याबाबत पत्र पाठवले पाहिजे. या पत्रात पीक कर्जासाठी सिबीलची अट नाही, हे नमूद असले पाहिजे. बँकांसोबत झालेल्या बैठकीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी होते. त्यांनीही याबाबत पुष्टी केलेली आहे. कुठल्याही पीक कर्जासाठी कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही, असा आदेश देण्यात आलेला आहे. येत्या ३० जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढच्या हंगामासाठी आपले शेतकरी कर्जासाठी पात्र असतील. राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांचे कृषी संदर्भातील ८० टक्के कर्जवितरणाचे टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्याच्या खरीप हंगामाची पूर्वतयारीची बैठक घेतली. त्या आधी बँकर्ससोबत कर्ज वाटपासंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळेल, याची तजवीज करण्यात आली. जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँक मिळून ६७ टक्के कर्ज दिले जाते तर २६ टक्के कर्ज हे इतर राष्ट्रीयकृत बँकांकडून देण्यात येते. परंतु राष्ट्रीयकृत बँकांकडून त्यांचे ८० टक्के कर्ज वितरणाचे टार्गेट पूर्ण होत नाही, ते त्यांनी पूर्ण केले पाहिजे. सगळ्या बँकांसोबत कर्जमाफी संदर्भात चर्चा केली आहे. कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉरमॅटमध्ये द्यायची याची चर्चा झाली आहे. वेळेत कर्जमाफी पूर्ण करू शकू याचे नियोजन केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…