राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही तर न्यायालयात जाऊ ; मनसेचा इशारा…….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील नियोजित सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाही, तर न्यायालयातून परवानगी मिळवू, अशी भूमिका मनसेने शुक्रवारी मांडली.
दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी १ मे रोजी होणाऱ्या सभेमुळे शहरातील वातावरण खराब होण्याची भीती व्यक्त केली. दरम्यान, मनसेने नागरिकांना घरोघरी जाऊन सभेसाठी निमंत्रण पत्रिका देण्याची तयारी सुरू केली आहे. सभेची पहिली पत्रिका ग्रामदैवत संस्थान गणपतीला विधीवत अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
मनसेने १ मे रोजीच्या सभेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील तीन दिवस सर्व नेते येथे ठाण मांडून आहेत. परवानगी मिळो अथवा न मिळो सभा होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी गरवारे स्टेडियमवर सभा घेण्याची सूचना केली, परंतु मनसेने सांस्कृतिक मंडळावरच सभेसाठी हट्ट धरला आहे.
पोलीस आयुक्त काय म्हणाले
पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी सांगितले, मनसेच्या सभेला परवागनी देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
शिवसेनेला काय म्हणतेय
शिवसेनेचे माजी खा.खैरे यांनी मनसेच्या सभेमुळे शहरातील वातावरण खराब होण्याची भीती व्यक्त केली आहे.
मनसेचा न्यायालयात जाण्याचा इशारा
पक्षप्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले, अजून पोलिसांकडून अधिकृतपणे काही कळविलेले नाही. जेव्हा त्यांच्याकडून काही उत्तर येईल, त्यानंतर आमची भूमिका ठरेल. सभेला परवानगी न मिळाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…